अकोलेत मुख्यमंत्र्याच्या प्रतिमा दहनप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल
अकोलेत मुख्यमंत्र्याच्या प्रतिमा दहनप्रकरणी सात जणांवर गुन्हे दाखल
अकोले: दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे यांसह विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांचे दुध आंदोलन सुरु असून अकोलेतही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याच्या प्रतिमेचे दहन केले . याप्रकरणी अकोले पोलिसांनी ७ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.
स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष दशरथ सावंत यांच्या नेतृत्वाखाली अकोले येथे बस्स्थानाकाजवळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवाणीस यांच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी सुभाष नवले, स्वभिमानीचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत नेहे , प्रकाश मालुंजकर, भाऊ सावंत, लक्षमण नवले भरत नवले आदी उपस्थित होते. यांवेळी आंदोलकांवर अकोले पोलिसांनी कलम ३७(१) चे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक करून सोडण्यात आले.
यावेळी दशरथ म्हणाले शेतकर्यांना काही माध्यमांनी दुधखुळे असे संबोधले त्यांचा आम्ही निषेध करतो आणि शेतकर्यांना दुध धंदा परवडत नाही, त्यामुळेच शेतकर्यांनी प्रतिलिटर पाच रुपय्र अनुदानाची मागणी केली, ही रास्त असून ते पैसे जनतेच्या करातून द्यावे लागणार म्हणतात , मग नोकरदारांना पाचवा आयोग , सहावा , सातवा देताना ते सर्व सामन्याच्या करातूनच देतात , मग याला विरोध का तेव्हा शेतकर्यांना कुणीही शहाणपण शिकवू नये राज्यातले सरकार हे वेळकाढू असून शेतकऱ्यांशी त्यांना काही देणे घेणे नाही असेही सावंत म्हणाले.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.