राहता : पाथरे बुद्रुक येथे विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू
राहता : पाथरे बुद्रुक येथे विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू
पाथरे बुद्रुक: राहता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील कांचन राकेश कडू वय २३ या विवाहितेचा घरापासून जवळ असणाऱ्या विहिरीत मृतदेह आढळला. या घटनेनंतर विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी आक्रमक होत सासरच्या घरसामोरच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी सासरच्या मंडळी विरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कांचन हिचा भाऊ किरण चांगदेव कदम याने लोणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, त्यात त्याने म्हटले कि, कांचन हिचे २३ मे २०१७ रोजी श्रीरामपूर येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात थाटामाटात लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस तीस सासरच्यांनी चांगले नांदविले. मात्र मानापानाच्या कारणावरून आमरसाच्या कार्यक्रमातून ते निघून गेले. त्यावेळी त्यांनी कांचनला बरोबर नेले नाही, त्यानंतर आठ दिवसानंतर मी तिला घेऊन सासरी सोडून आलो. त्यानंतर तिला सासरे , सासू , नवरा, दीर व नणंद यांच्याकडून या न त्या कारणावरून सतत त्रास चालू झाला. तिला शिवीगाळ करण्यात आली.
याबाबत कांचन ने वेळोवेळी आम्हाला फोन वरून सांगितले. दिवाळी दरम्यान नवरा राकेश याने सोन्याची अंगठी व कपड्यांची मागणी केली अन्यथा कांचनला नांदायला नेणार नाही अशी धमकी दिली. दि. १७ जुलै २०१८ रोजी तिने मला केला व मला खूप त्रास चालू आहे उद्या मला भेटायला ये असे सांगितले. त्यानंतर दि. १८ रोजी तिने विहिरीत जीव दिल्याचे तिच्या सासर्याने सांगितले. यावरून कांचनाचा नवरा राकेश रामदास कडू , सासू विजया रामदास कडू, सासरा रामदास परशुराम कडू, दीर वीरेश भाया रविराज रामदास कडू , जाव ज्योती रविराज कडू यांच्याविरुद्ध भा.द.वि. कलम ४९८ अ ३०६,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्यंत तणावपूर्वक वातावरणात मृत काचांवर सासरच्या दारातच अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.