तळेगावमध्ये टँकर अडवून अंदाजे एक हजार लिटर दुध रस्त्यावर ओतले.
तळेगावमध्ये टँकर अडवून अंदाजे एक हजार लिटर दुध रस्त्यावर ओतले.
तळेगाव दिघे: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात आंदोलकांनी पराग डेअरी मिल्कच्या गोवर्धन संघासाठी दुध घेऊन चाललेला टँकर अडविला व अंदाजे एक हजार लिटर दुध रस्त्यावर ओतले. रात्री सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांना हुलकावणी देत या टँकर चा पाठलाग अज्ञात आंदोलकांनी करत हि कामगिरी केली.
संगमनेर ते कोपरगाव रस्त्याने मंचर येथील पराग डेअरी मिल्कच्या गोवर्धन संघासाठी दुध संकलन करण्यात आले होते. या दुधाच्या टँकरला(एम.एच.०८ ०४९४) पोलीस बंदोबस्तात पुरविण्यात आला होता. मात्र तळेगाव चौफुली पर्यंतच बंदोबस्त होता तळेगाव नजीकच्या पेट्रोल पंपापर्यंत टँकर जाताच अज्ञात आंदोलकांनी हि कामगिरी केली. या प्रकाराने आंदोलन चिगळण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.