Home अकोले अकोले: गायीच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू

अकोले: गायीच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू

अकोले: गायीच्या हल्ल्यात शेतकर्याचा मृत्यू

चास: अकोले तालुक्यातील चासमध्ये वृद्ध शेतकऱ्यावर अचानक गाईने हल्ला केला. या हल्ल्यात मानेत शिंग घुसल्याने मोठ्या प्रमाणत शिंग घुसल्याने रक्तश्राव झाल्याने त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चास गावामध्ये आनंदवाडी शिवारामध्ये वास्तव्यास असणारे पांडू तात्याबा शेळके हे उंच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या शेतामध्ये सकाळी दहा वाजेच्या सुमारास गायी चारत होते. यातील एका गाईने अचानक जवळ उभ्या असलेल्या पांडू शेळके यांना जोराची डूसनी देऊन खाली पाडले व गायीचे शिंग मानेत व पायाच्या मांडीत घुसल्याने शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला. शेळके यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक धावून आले. ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी अकोले येथे नेले. शेळके यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना लोणी येथे पाठविले. अति रक्तश्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शवविचेदन झाल्यानंतर रात्री उशिरा चास येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   

ravishankar happiness

Website Title: akole news Farmer’s death in cows attack


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here