संगमनेर: कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा जनावरांपुढे
संगमनेर: कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा जनावरांपुढे
संगमनेर: राबराब शेतात राबून गावठी कांदा केला. त्यानंतर याच कांद्याला बाजारभाव नसल्याने पुढे चांगले बाजारभाव मिळतील. या आशेने आरणीमध्ये दोन ते तीन महिने कांदा तळहाताच्या फोडाप्रमाणे साठवून ठेवला पण आता हाच गावठी कांदा व्यापार्यांच्या दृष्टीने कवडी मोल झाला आहे. जुना गावठी कांदा असेल तर विक्रीस आणू नका असे व्यापारी म्हणत असल्याने त्यामुळे संतप्त झालेल्या संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा परिसरातील जोठेवाडी येथील नामदेव लक्षमण गाडेकर या शेतकऱ्यावर कांदा जनावरांपुढे टाकून देण्याची वेळ आली आहे.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
नामदेव गाडेकर हे आपल्या शेतात दरवर्षी गावठी कांद्याची लागवड करत असतात. त्यामुळे कांद्याचेही चांगले पैसे होत असतात. पण या वर्षीही कांद्याला चांगले बाजारभाव मिळतील म्हणून त्यांनी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी कांद्याची लागवड केली. तीन ते चार महिन्यांनी हा कांदा काढला असता त्यावेळी बाजारभाव नव्हते म्हणून गाडेकर यांनी सर्व कांदा काढून आरणी मध्ये साठविला व तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला पण आता कांद्याला मोड येऊन टो खराब होऊ लागल्याने त्यांनी बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेण्याचे ठरविले आणि त्यानुसार पिकप मध्ये कांद्याच्या गोनीही भरल्या व विक्रीसाठी बाजार समिती मध्ये नेला.
पण कांदा पाहून व्यापारी म्हणाले की हा जुना गावठी कांदा आहे. त्यामुळे त्याला बाजारभाव हि नाही. तो विक्रीसाठी पुन्हा आणू नका असे म्हणताच शेतकरी हवालदिल झाले. राहिलेल्या कांद्याचे नेमकी करायचे काय असा प्रश्न त्यांच्यापुढे आला. शेवटी हा सर्व कांदा जनावरांनपुढे टाकून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तळहाताच्या फोडाप्रमाणे साठविलेल्या कांद्याची देखभाल केली. खत, औषध, फवारणी यांचाही खर्च वसूल झाला नाही. पण आता व्यापारीच जर कवडीमोल भावाने कांदा खरेदी करू लागले तर त्यापेक्षा जनावरांना टाकून दिलेला चांगला राहील असे गाडेकर यांनी सांगितले आहे. सध्या कोणत्याच शेतीमालाला बाजारभाव नसल्याने त्यामुळे सर्व सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे.
Website Title: sangamner news onion prices are getting reverse, then onion janavar
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: