Home अकोले अकोले: कार अपघातात तरुणाचा मृत्यू

अकोले: कार अपघातात तरुणाचा मृत्यू

अकोले: कार अपघातात तरुणाचा मृत्यू

अकोले: अकोले तालुक्यातील रतनवाडीजवळ महिंद्रा जितो या कंपनीची गाडी (एम.एच.१४ जी.उ.०८३९) पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जन जखमी झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील अजित कारभारी गायकर वय ३८, आकाश शिवाजी आरोटे व संतोष जालिंदर आरोटे हे भंडारदरा परिसरात रंधा, भंडारदरा धरण, रतनवाडी व संधानदरी बघण्यासाठी रविवारी आपल्याजवळील महिन्दा जितो कंपनीच्या गाडीने आले होते, संध्याकाळच्या सुमारास रतनवाडीवरून साम्रदकडे अजित सह त्याचे मित्र प्रवास करीत असताना अजित गायकराने एका वळणाच्या उतारावर ब्रेक मारल्याने गाडी पलटी होऊन किन्नरच्या बाजूने उताराच्या दिशेने घसरत गेली त्या गाडीखाली अजित गायकर दबला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला त्याच्याबरोबर असणारे दोघेजण जखमी झाले आहेत. अजित गायकरला राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सदर तरुणाचे शवविच्छेदन राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात केले असून या अपघाताची तक्रार आकाश शिवाजी आरोटे यांनी राजूरपोलीस ठाण्यात केली आहे. सदर अपघाताचा तपास राजूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक कादरी साहेब करीत आहे.   

पहा बातमी: नगर महापालिका त्रिशंकू तर धुळ्यात भाजपची मुसंडी

पहा बातमी -संगमनेर: सोळा वर्षीय मुलाचे अपहरण

Website Title: Akole news The death of a young man in a car accident


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here