Home अकोले अकोले: बंदिस्त कॅनॉलप्रश्नी आपण शेतकर्यांसोबत – आ. पिचड

अकोले: बंदिस्त कॅनॉलप्रश्नी आपण शेतकर्यांसोबत – आ. पिचड

अकोले: बंदिस्त कॅनॉलप्रश्नी आपण शेतकर्यांसोबत – आ. पिचड

अकोले: निळवंडे धरणाचे मुख्य कालवे बंदिस्त पाईप मधून न्यावेत हि आपली भूमिका आहे. उपोषणकर्त्यांना उपोषण सोडवण्यासाठी तालुक्यातील काही संधीसाधू नेते येतील. या नेत्यांच्या फसवेगिरीपासून सावध राहा असा सल्ला देऊन आपण बंदिस्त पाईप कॅनॉलच्या प्रश्नात सदैव आपल्याबरोबर आहे असे प्रतिपादन आ.वैभवराव पिचड यांनी केले.

निळवंडे धरणाचे तालुक्यातील कालवे बंदिस्त पाईपलाईन मधून न्यावेत या प्रमुख मागणीसाठी कालवेग्रस्त शेतकर्यांनी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. यावेळी शेतकर्यांच्या भावना तीव्र होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे की, बंदिस्त पाईपमधून कालवे नेण्यासाठी लवकर काम पूर्ण होऊ शकते. शिर्डी संस्थान पाण्यासाठी ५०० कोटी देवून बंदिस्त पाईप मधून पाणी नेणार आहे. संगमनेरकरांसाठी पाणी बंदिस्त पाईपमधून जाऊ शकते तर अकोल्यातून कालवे बंदिस्त पाईपमधून का होऊ शकत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

उघड्या पद्धतीने कालवे झाले तर अनेक शेतकरी भूमिहीन होतील. शासकीय अहवालानुसार ४० टक्के पाण्याचे बाष्पीभवन व पाझर होऊन पाण्याची नासाडी होऊ शकते. बागायती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

यावेळी अशोक आरोटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरीजाजी जाधव, जि.प. बांधकाम सभापती कैलासराव वाकचौरे, रमेश देशमुख, शंभू नेहे, अरुण शेळके, महेश नवले, सुनील धुमाळ, प्रदीप हासे, बाळासाहेब वाळूंज, संतोष तिकांडे, सुभाष मालुंजकर, दिलीप तिकांडेशरद नेहे, शिवाजी कोठवळ, गोरख मालुंजकर, सचिन जोशी, गणेश शेटे, सुमित मालुंजकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

पहा बातमी: जन्मदात्या पित्याकडून १२ वर्षीय मुलीवर अत्याचार

Website Title: MLA Vaibhavrao Pichad Offshore Canal Problems With Farmers


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here