Home अकोले अकोलेत छापा: असा करायचा दुधात भेसळ, केला पर्दाफाश

अकोलेत छापा: असा करायचा दुधात भेसळ, केला पर्दाफाश

Akole Raid To do this is to adulterate milk Today News

अकोले| Akole:  तालुक्यातील जांभळे येथील दुध संकलन करणाऱ्या योगेश चव्हाण यास दुधात तेल व पावडर भेसळ करुन दुध संकलन करत असतांना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. दूध भेसळ प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

१५ गोणी पावडर व तेल ड्रम आदी साठा अहमदनगर येथील अन्न व औषध सुरक्षा विभागाने छापा टाकून हस्तगत केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे त्याचे पथक व अकोले प्रभारी पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, उपनिरीक्षक बी बी हांडोरे यांच्या सयुंक्त पथकाने अकोले तालुक्यातील जांभळे येथील शिंदेवाडीतील योगेश चव्हाण हा दुधात भेसळ करत असल्याचे खबरीवरुन चव्हाण याचे घरी आज बुधवार दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता छापा टाकण्यात आला. यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठीची १५ गोणी पावडर, तेल ड्रम सह साहित्य मिळून आले. तेथील ४० लिटर दुधातून सॅपल घेतले, तसेच तो चालवत असलेले जांभळे येथील संकलन केंद्रावरही छापा मारून तेथील जवळपास १ हजार लिटर दुध नष्ट केले. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारीनी पंचनामा करुन मुद्देमाल ताब्यात घेऊन सॅपल तपासणीसाठी घेऊन गेले. या सॅपलचा अहवाल आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यानी दिली.

यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे  

अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बढे, पवार, सुर्यवंशी, साैरभ व पोलिस सपोनी मिथुन घुगे, उपनिरीक्षक बी.बी.हांडोरे,पो.कॅा.बढे, पो.ना.गणेश शिंदे, विठ्ठल शरमाळे, क्षीरसागर, वलवे. पोलिस वाहन चालक मोरे यांनी ही कारवाई केली आहे.

Web Title: Akole Raid To do this is to adulterate milk

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here