Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज ११ करोनाबाधित

Akole: अकोले तालुक्यात आज ११ करोनाबाधित

Akole taluka 12 coronavirus infected today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज रविवारी दुपारी प्राप्त अहवालात तब्बल ११ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची करोनाबाधितांची संख्या १४७ वर पोहोचली आहे.

या अहवालात शहरातील सुभाष रोड येथील काल बाधित आढळून आलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील ३ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर संगमनेर येथे आढळलेल्या पोलिसाच्या कुटुंबातील सहा जणांना करोनाची लागण झाली आहे. याचबरोबर उंचखडक, मवेशी (धामणवन) येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

अहमदनगर शासकीय प्रयोगशाळेतील अहवालात सुभाष रोड ५५ वर्षीय, ५७ वर्षीय महिला व ४ वर्षीय बालक, तहसील कचेरी जवळील कॉलनीत पोलीस कर्मचारी कुटुंबातील ५० वर्षीय, २८ वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरुष, ६ व ७ वर्षीय लहान मुले, ४ वर्षीय मुलगी, तालुक्यातील उंचखडक येथील ६० वर्षीय पुरुषाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

खासगी प्रयोगशाळेत मवेशी (धामणवन) येथील रहिवासी चाकण पुणे येथे कंपनीत कामाला असलेला २९ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole taluka 11 coronavirus infected today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here