Home अकोले अकोले तालुक्यात करोनाची वाटचाल दुसऱ्या शतकाकडे

अकोले तालुक्यात करोनाची वाटचाल दुसऱ्या शतकाकडे

Akole Taluka Corona patient increased  

अकोले | Akole: अकोले तालुक्यात काल गुरुवारी सकाळी दोन, खानापूर येथील रॅपिड अॅटीजेन टेस्टमधून ५ तर सायंकाळी खासगी प्रयोगशाळेतून तीन अहवाल प्राप्त असून दिवसभरात १० रुग्ण आढळून आले आहेत. एकूण करोनाबाधितांची संख्या १७८ वर पोहोचली आहे. 

गुरुवारी सकाळी खासगी प्रयोगशाळेत इंदोरी फाट्यानजीक पती पत्नीला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. 

सायंकाळी खासगी प्रयोग शाळेतून नवीन नवलेवाडी येथे धुमाळवाडी रोडलगत असलेल्या एका कॉलनीत एकाच कुटुंबातील ६३ वर्षीय महिला, ३३ वर्षीय महिला व ३४ वर्षीय पुरुषाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

खानापूर येथील कोविड सेंटरमध्ये शहरातील शिवाजी चौकातील, ५० वर्षीय महिला, इंदोरी येथील २४ वर्षीय महिला, १६ वर्षीय तरुणी,निब्रळ येथील ४६ वर्षीय पुरुष, म्हाळादेवी येथे ८६ वर्षीय पुरुष यांची टेस्ट करोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा दुसऱ्या शतकाकडे वाटचाल करीत आहे. सध्या १२० जण करोनामुक्त झाले आहेत तर ५५ व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. 

Web Title: Akole Taluka Corona patient increased  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here