Coronavirus: नवनीत राणा व रवी राणा यांना करोनाची लागण
Coronavirus/नागपूर: अमरावतीचे खासदार नवनीत राणा यांना करोनाची लागणी झालेली आहे. त्याचपाठोपाठ त्यांचे पती रवी राणा यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राणा कुटुंबातील १२ सदस्यांना करोनाची लागण झाली आहे.
या दाम्पत्यांच्या मुलानाही करोनाची लागण झाली आहे. रवी राणा यांच्या आई वडिलांनाही अगोदरच २ ऑगस्टला करोनाची बाधा झालेली आहे. रवी राणा यांच्या आई वडिलांवर नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील मुलगा, मुलगी, बहिण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या असे १२ जणांना करोनाची लागण झाली आहे.
अमरावती येथील आरोग्य यंत्रणा ढासळली आहे. रुग्णांचे हाल होत आहे. असा आरोप नवनीत राणा यांनी मागील काही दिवसांपूर्वी केला होता.
Website Title: Navneet Rana and Ravi Rana Coronavirus infected