Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात सोळा करोनाबाधित आढळले

Sangamner: संगमनेर तालुक्यात सोळा करोनाबाधित आढळले

Sangamner Taluka 16 coronavirus infected 

Sangamner | संगमनेर: तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी खासगी व रॅपिड अॅटीजेन टेस्ट द्वारे १६ करोनाबाधित आढळून आले आहेत. खासगी प्रयोगशाळेत ३ व रॅपिड अॅटीजेन टेस्ट द्वारे १३ असे बाधित आढळून आले आहेत. 

यात खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तालुक्यातील जोर्वे येथील ६९ वर्षीय पुरूष, तळेगाव येथे ३५ वर्षीय महिला, नान्नज येथे ६३ वर्षीय महिला यांना करोनाची लागण झाली आहे. 

रॅपिड अॅटीजेन टेस्ट द्वारे १६ करोनाबाधित यानुसार शहरातील जनता नगर येथे ४१ वर्षीय पुरुष, इंदिरा नगर येथे २६ वर्षीय तरुण, ५० वर्षीय व्यक्ती, मालदाड रोड येथे २६ वर्षीय तरुण, श्रमिक नगर येथे ३२ वर्षीय पुरुष असे करोनाबाधित आढळून आले आहेत.

तसेच तालुक्यातील घुलेवाडी येथे २६ वर्षीय तरुणी, ४७ वर्षीय पुरुष, कासरा दुमाला येथे दीड वर्षाची मुलगी, धांदरफळ येथे १९ वर्षीय तरुणी, तळेगाव दिघे येथे ३४ वर्षीय पुरुष, चिखली येथे २३ वर्षीय तरुणी, ५४ वर्षीय महिला, कर्हे येथे ५५ वर्षीय पुरुष असे १३ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. 

तालुक्यात एकूण ९२६ जणांना करोनाची लागण झालेली आहे. यामध्ये ७५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. १९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सध्या १६ जणांवर उपचार सुरु आहेत. 

Web Title: Sangamner Taluka 16 coronavirus infected

Get latest Marathi News and Maharashtra News 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here