Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात आज तब्बल ४० जण करोना पॉझिटिव्ह

Sangamner: संगमनेर तालुक्यात आज तब्बल ४० जण करोना पॉझिटिव्ह

Sangamner Taluka 40 corona infected today

संगमनेर |Sangamner : आज गुरुवारी खासगी प्रयोगशाळेतून व रॅपिड अॅटीजेन टेस्ट द्वारे तब्बल ४० करोनाबाधित आढळून आले आहे. खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार शहरातील रेहमतनगर ३९ वर्षीय महिला, जाणता राजा मार्ग ४ वर्षीय पुरुष, धांदरफळ खुर्द ५८ वर्षीय महिला, आंबी खालसा येथे ४२ वर्षीय पुरुष, श्रमिकनगर येथे ४८ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ३१ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय महिला, १६ वर्षीय तरुण, चंदनापुरी येथे ३२ वर्षीय तरुण यांना करोनाची लागण झाली आहे.

मालपाणी लोन्स येथे १५२ जणांची रॅपिड अॅटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात ३२ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात इंदिरानगर ६५ वर्षीय पुरुष, ५४ व ३२ वर्षीय महिला, १३ वर्षीय तरुणी, ११ वर्षीय मुलगा, मालदाड रोड येथील ५५ वर्षीय महिला, उपासनी गल्लीतील ५० वर्षीय व्यक्ती, रंगारगल्ली येथील १४ व २४ वर्षीय तरुण, ३८ वर्षीय पुरुष, ३७ वर्षीय महिला, ७२ वर्षीय व्यक्तीला करोनाची बाधा झाली आहे.

तालुक्यातील चिखली येथे ४५ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे २० वर्षीय व २२ वर्षीय २ तरुण २३ वर्षीय तरुणी, ५१ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह आले. नान्नज येथील पाच महिन्याची बालिका, ६५ वर्षीय पुरुष, वडगाव पान येथील २९ वर्षीय महिला, २२ वर्षीय तरुणी, ८ वर्षीय मुलगी, ४७ वर्षीय महिला, ५२ ३०,२६, वर्षीय पुरुष, ५ वर्षाचा मुलगा, २६ वर्षीय महिला, पोखरी येथे २४ वर्षीय तरुणी, १ वर्षीय बालिकेला करोनाची लागण असे एकूण तब्बल ४० जण करोनाबाधित असल्याचे आज दिवसभरात आढळून आले. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या ९०९ इतकी झाली आहे.

वाचकहो, ‘युवा बात संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner Taluka 40 corona infected today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here