अकोले तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन
अकोले तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अन्यथा तीव्र आंदोलन
अकोले: राज्यातील भाजपा सरकार हे राजकीय सुडातून अकोले तालुक्यावर अन्याय करीत आहे. अकोले तालुक्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून जायकवाडीसाठी धरणातून सोडलेले पाणी त्वरित थांबविण्यात यावे. शेतीसाठी पूर्णदाबाने ११ तास सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी हे अंतिम आंदोलन असून यापुढे तालुक्यात कोणतेही निवेदन व पूर्वसूचना न देता उग्र उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आ. वैभवराव पिचड यांनी दिला.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
अकोले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात यावा भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी सोडलेले पाणी त्वरित थांबविण्यात यावे शेतीसाठी पूर्ण दाबाने व अखंडित ११ तास वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी तहसील कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकार्यांशी बोलताना आ. वैभवराव पिचड बोलत होते. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, तालुकाधाक्ष गिरजाजी जाधव, जेष्ठ नेते मीनानाथ पांडे, राष्ट्रवादी किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकरराव नवले, पर्बतराव नाईकवाडी, यशवंतराव आभाळे, के. डी. धुमाळ, बाळासाहेब वडजे, आदी उपस्थित होते.
तहसीलदार मुकेश कांबळे, जल संपदाचे शाखा अभियंता रामनाथ आरोटे, वीज वितरण कंपनीचे उप अभियंता श्री बागुल यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आ. वैभवराव पिचड यांनी अधिकार्यांना धारेवर धरत पालक मंत्री व प्रांतधिकारी यांनी प्रवरा नदीवरील उपोषण सोडतेवेळी वीज पुरवठ्याबाबत दिलेल्या आश्वासनाचे काय झाले? इतर तालुक्यात वीज पुरवठ्याबाबत वेगळा निर्णय व अकोले तालुक्यात वेगळा निर्णय असे घडू नये. इतर तालुके हे सपाटीवर असल्याने त्यांना लागणारा वीज पुरवठा यापेक्षा अकोले तालुक्यात जास्त वीज पुरवठा लागतो. त्यामुळे अकोले तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त काळ वीज पुरवठा देण्यात यावा. तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नसल्याने भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी पाण्याचे टंकर सुरु करावे लागणर आहे. अशी पिण्याच्या पाण्याची अवस्था आहे.
दुष्काळ जाहीर करण्याच्या पावसाच्या निकषामुळे अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला नाही. त्यातच भंडारदरा व निळवंडे धरणाचे पाणी जायकवाडीला सोडण्याचा निर्णय झाला. या दोन्ही मुद्द्यांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम आवाज उठविला. तहसीलदार प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य सचिव, पालकमंत्री, महसूलमंत्री, मुक्यामंत्री यांचेकडे निवेदन दिली. अकोल्यात मोर्चा काढला तरीही शासनाला जाग आली नाही. तालुक्यात खरीपाचे पीक पूर्णपणे वाया गेलेले आहे, रब्बीची लागवड झालेली नाही उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण होणार आहे. नागरिकांना रोजगार नाही, जनावरांना चाराही नाही अशी दुष्काळी परिस्थिती असतना पीक आणेवारी ५० पैशापेक्षा कमी लागलेली असताना शासन अकोले तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी हेतूपुरस्कर टाळाटाळ करीत आहे.
प्रवरा नदीवरील जल सेतूवर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने आ. वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला जाऊन या आंदोलनास पाठींबा दिला. तीन दिवस आंदोलन करूनही सरकारला जाग आलेली नाही. त्यामुळे अकोले तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.
Website Title: Akole taluka declare drought otherwise the agitation
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: