Home अकोले अकोले: धुमाळवाडीत विवाहेतेचा स्वाईन फ्लूने मृत्यू, अकोलेत पाचवा बळी

अकोले: धुमाळवाडीत विवाहेतेचा स्वाईन फ्लूने मृत्यू, अकोलेत पाचवा बळी

अकोले: धुमाळवाडीत विवाहेतेचा स्वाईन फ्लूने मृत्यू, अकोलेत पाचवा बळी

अकोले: तालुक्यातील धुमाळवाडी येथील आशा सचिन झोळेकर वय २६ हिचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. अकोले तालुक्यातील स्वाईन फ्लू बळींची संख्या ५ वर गेली आहे आणि बरचसे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

स्वाईन फ्लू चा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मयत आशा झोळेकर ही दहा ते बारा दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते परंतु उपचारास पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे तिला नाशिक येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु असतानाच शुक्रवारी दि. २८ रोजी दुपारी २:३० वाजता तिची प्राणज्योत मालवली. तिच्या पश्चात दोन मुले, पती, आई वडील सासू सासरे असा परिवार आहे. काल धुमाळवाडी येथे शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान स्वाईन फ्लू आजारासंदर्भात व जनजागृती बाबत तहसीलदार यांच्या कार्यालयात वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी यांची बैठक पार पडली. सर्दी खोकला आल्यास जवळच्या आरोग्य व प्राथमिक केंद्र, ग्रामीण रुग्णालय यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.गंभिरे यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. शहरात रिक्षादवारे जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.   


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here