Home अहमदनगर चुलत दिराने मध्यरात्री घरात घुसून भावजयीस मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला

चुलत दिराने मध्यरात्री घरात घुसून भावजयीस मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला

राहाता: चुलत दिराने मध्यरात्री घरात घुसून भावजयीस मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला

राहाता: पती बाहेरगावी असल्याने घरात एकटी झोपलेली असलेल्या भावजयीवर तिच्या चुलत दिराने मध्यरात्री घरात घुसून भावजयीस मारहाण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना साकुरी येथे घडली. या प्रकरणी राहाता पोलीसांनी आरोपी चुलत दिराविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाला आहे.  

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

याबाबत पोलीसांकडून समजलेल्या माहितीनुसार, गुरूवार दि. २७ रोजी रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास साकुरी येथे  ही घटना घडली. पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला एकटी घरी झोपलेली असताना तिचा वाकडी येथील चुलत भाया याने रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास घराची कडी वाजवली व तो घरात घुसून म्हणाला,  दोन दिवसापासून तुझा नवरा घरी आला नाही, त्याला शोधून काढू, तू काळजी करू नको त्यानंतर घराची आतून कडी लावून मी आज तुझ्या घरी मुक्काम करत’ असे तो म्हणाला. 

त्याला नवरा घरी नाही तुम्ही थांबू नका असे मी सांगीतले असता त्याने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अत्याचार केला. कुणाला सांगीतले तर जिवंत मारून टाकील अशी धमकी देऊन तो निघून गेला. याची फिर्याद सदर अत्याचारीत महिलेने राहाता पोलीसांत दिली असून त्यावरून राहाता पोलीसांनी आरोपीच्या विरूद्ध भादंवि कलम ३७६ (१) (क) ४५२,३२३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला. 


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here