Home अकोले अकोले तालुक्यात पंचायत समितीत पुन्हा पिचडांचीच सत्ता!

अकोले तालुक्यात पंचायत समितीत पुन्हा पिचडांचीच सत्ता!

Akole taluka Panchayat Samiti pichad power

अकोले,ता.२३(Akole): तालुक्यातील महात्वाच्या संस्थेवरील पकड कायम ठेवत राज्याचे माजी मंञी मधुकरराव पिचड,माजी आमदार वैभवराव पिचड यांनी तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी साै.उर्मिला राजाराम राऊत याची निवड करुन सत्ता पुन्हा आपल्या भाजपाच्या ताब्यात ठेवली आहे.

अकोले तालुका पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडीनंतर काही महिन्यातच सभापती दत्ता बो-हाडे यांचे अपघाती निधन झाल्याने पुन्हा सभापती पदाची निवड प्रक्रिया आज गुरुवारी सकाळी पंचायत समिती सभागृहात झाली. यावेळी पिठासन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे होते .सकाळी ११ ते १ पर्यत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे मवेशी गणातुन निवडून आलेल्या साै.उर्मिला राजाराम राऊत यांनी एकमेव उमेदवारी अर्ज सभापती पदासाठी दाखल केला.यावर सूचक म्हणून विद्यामान उपसभापती दत्तात्रय देशमुख आहे. दुपारी ३ वाजता सभागृहात बैठक होऊन यात पिठासन अधिकारी मंगरुळे यांनी सभापती पदासाठी एकमेव अर्ज आलेल्या साै.राऊत यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

यावेळी शिवसेनेचे तिन सदस्य अनुपस्थित होते तर भाजपाचे विद्यमान उपसभापती दत्ताञय देशमुख,सदस्या अलका अवसरकर,श्रीमती सारीका कडाळी,सिताबाई गोंदके,माधवी जगधणे,गोरख पथवे हि माजी मंञी पिचड व मा.आ.पिचड याच्या नेतृत्वाखाली भजपाचे ०७ सदस्य व शिवसेनेच्या माजी सभापती व विद्यमान सदस्य साै.रंजना भरत मेंगाळ उपस्थित होते.

यानिवडीनंतर भारतीय जनता पार्टीच्या अकोले कार्यालयात नुतन सभापतीचा माजी आ.वैभवराव पिचड यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सीताराम गायकर,तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे,गिरजाजी जाधव,यशवंतराव आभाळे,व सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी माजी आ.वैभवराव पिचड म्हणाले कि आज होत असलेल्या या निवडीला दुःखाची झालर आहे कारण चार महिन्यापूर्वी सभापती पदी आपण निवडलेले कर्तबगार सभापती स्व.दत्ताञय बो-हाडे यांचे अपघाती निधन झाले आहे.यानंतर आज निवड होत आहे माञ एक कर्तबगार सभापती आज आपल्यात नाही याची खंत आहे.स्व.बो-हाडे यांनी चार महिने काम करताना पिचड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या माध्यमातुन तालुक्यातील गोरगरिबांचे घरकुल, बंधारे, रस्ते आदि विविध विकासकामे मार्गी लावलीत. सभापती पदी निवड होताच कोरोनाचे संकट आल्याने याकाळातही ते स्वस्त बसले नाही त्यानी पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्राची माहिती घेऊन असलेल्या अडचणी बाबत माजी मंञी पिचड साहेब व मला कळविल्याने आपण त्यांना जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी याच्याशी चर्चा करुन प्रश्न सोडवले.

आता पुढील कार्यकाळात स्व.बो-हाडेचे तालुक्याचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम नुतन सभापती साै उर्मिला राऊत, उपसभापती दत्ताञय देशमुख व सर्व सदस्य करतील.आता पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याचा विकास पूर्ण करणार आहे.यावेळी जिल्हा बॅकेचे अध्यक्ष यांनी शुभेच्छा दिल्या .

विरोधकांवर उमेदवार देण्याचीही नामुष्की

मागील सभापती निवडीवेळी काही सदस्य सोडून विरोधकाकडे गेली होती माञ त्यांना जाणिव झाली कि विरोधकाकडुन केवळ वापर केला जातो यामुळे गेलेले सदस्यांनी माजी मंञी मधुकरराव पिचड यांचेकडे चूक मान्य करत पुन्हा आपल्या गडाकडे आल्याने आपल्या कडे संख्याबळ आठ झाल्याने व विरोधकांना त्यांची संख्या घटल्याची कळाल्याने त्यांना सभापती पदासाठी उमेदवारही देता आला नाही. असा टोला माजी आ.वैभवराव पिचड यांनी लगावला.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole taluka Panchayat Samiti pichad power

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here