धक्कादायक: संगमनेर तालुक्यात आज २२ नवे करोनाबाधीत
Coronavirus/संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज २२ करोनाबाधितांची वाढ झाली आहे. संगमनेर तालुक्यात २२ पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
संगमनेर तालुक्यात कसारा दुमाला येथे तब्बल नऊ रुग्ण आढळून आले आहेत. यात ४३,४०,६७,३८,१०,३८,१४ वर्षीय पुरुष तर १२ आणि ६७ वर्षीय महिला आहेत.
मालदाड रोड येथे ५२ व ५३ वर्षीय महिला,गणेशनगर येथे १५ वर्षीय तरुण, ३९ वर्षीय महिला, जनता नगर येथे ३२ व ४८ वर्षीय पुरुष, जेधे कॉलनी येथे ६६ वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथे ३५ वर्षीय महिला, पदमानगर येथे १७ वर्षीय तरुणी, गुंजाळवाडी पठार येथे ४० वर्षीय महिला, वाघापूर येथे ३८ वर्षीय महिला, दाढ खुर्द येथे २५ वर्षीय पुरुष असे २२ रुग्ण वाढले आहेत.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Coronavirus Sangamner 22 corona infected