Home क्राईम बायको सोडून गेल्याने भावानेच केला मोठ्या भावाचा खून

बायको सोडून गेल्याने भावानेच केला मोठ्या भावाचा खून

Sangamner big brother Murder

संगमनेर(Sangamner): तू माझ्या बायकोला सारखी शिवीगाळ करीत असतो तुझ्या शिवीगाळ करण्यामुळेच माझी बायको मला सोडून गेली या कारणामुळे झालेल्या वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाचा चाकूने खून केल्याची घटना घडली आहे.

साहेबराव मनोहर अभंग याने किशोर मनोहर अभंग याचा खून केला आहे. ही घटना बुधवारी रात्री संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकेवाडी रस्त्यानजीक मात्तोडे मळा येथे घडली. याप्रकरणी वडील मनोहर काशिनाथ अभंग यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून साहेबराव अभंग याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मातोडे मळ्यात मनोहर अभंग हे तीन मुलांसमवेत राहतात बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान दोघा भावांत भांडण झाले. तू माझ्या बायकोला शिवीगाळ करीत असतो त्यामुळे माझी बायको मला सोडून गेली असे साहेबराव किशोर याला म्हंटले.

रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास वडील व लहान भाऊ सचिन यांच्या खोलीच्या दरवाजावर लाथा मारू लागला मात्र दरवाजा उघडला नाही. याच दरम्यान शेजारील एका व्यक्तीने किशोर जखमी झाल्याचे ओरडून सांगितले त्यानंतर मनोहर अभंग व सचिन हे घराबाहेर आले. त्यावेळी साहेबराव चाकुला धार लावीत होता सर्वत्र रक्त बंबाळ होते. जखमी झालेल्या किशोरला दुचाकीहून रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारअगोदरच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी साहेबराव अभंग याला अटक करण्यात आले आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Sangamner big brother Murder

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here