Home अकोले अकोले तालुक्यात वीरगाव येथे एक करोनाबाधित तर एकाचा मृत्यू

अकोले तालुक्यात वीरगाव येथे एक करोनाबाधित तर एकाचा मृत्यू

Coronavirus Akole Virgaon one and one death

Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. अकोले तालुक्यातील विरगाव येथील एका १२ वर्षाच्या मुलीचा अहवाल आज गुरुवारी सकाळी प्राप्त झाला. तालुक्यातील रुग्णांची संख्या ७४ वर पोहचली आहे. यात ४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २९ जणांवर उपचार सुरु आहेत.

सकाळी नाशिक येथील शासकीय  रूग्णालयात केळी गोडेवाडी येथील ७५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने  मृत्यू झाला आहे.  सदर ७५ वर्षीय व्यक्ती मुंबईहून तालुक्यातील केळी गोडेवाडी या गावी आल्यानंतर ञास जाणवू लागल्याने अहमदनगर येथे खाजगी प्रयोगशाळेत  तपासणी  केली असता त्याचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह  आल्यानंतर तो नाशिक येथील शासकीय रूग्णालयात उपचार घेत होता. सदर व्यक्तीचा उपचार सुरु असताना काल मध्यरात्री मृत्यू झाला आहे. तालुक्यातील रुग्णांची संख्या ७४ वर पोहचली आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Akole Virgaon one and one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here