Home अहमदनगर अहमदनगर:  मुकादमावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

अहमदनगर:  मुकादमावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक

Breaking News | Ahmednagar: मुकादमावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक (Arrested).

Arrested two people who opened fire on the trial

अहमदनगर: लेबर मुकादमावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (वय २० रा. पाटोदा, ता. जामखेड) व कुणाल जया पवार (वय २२ रा. कान्होपात्रानगर, जामखेड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार व गावठी कट्टा जप्त केला आहे.

लेबर मुकादम आबेद बाबुलाल पठाण (वय ४० रा. भवरवाडी, जामखेड) यांच्याकडील कामगार लक्ष्मण कल्याण काळे (रा. जामखेड) यांना अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने सुमारे दीड वर्षांपूर्वी मारहाण केली होती. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचा राग मनात धरून अक्षय उर्फ चिंग्या मोरे याने त्याच्या साथीदारासह रविवारी (दि. ३) पठाण यांना शिवीगाळ करून, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळ्या झाडल्याने पठाण यांच्या उजव्या पायाच्या पोटरीला दुखापत झाली होती. याप्रकरणी पठाण यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून गुन्ह्यातील पसार संशयित आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार बापूसाहेब फोलाणे, रवींद्र कर्डिले, विश्वास बेरड, विशाल दळवी, रोहित मिसाळ, बबन मखरे, देवेंद्र शेलार, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, रणजीत जाधव, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे, भरत बुधवंत यांचे पथक नियुक्त करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पथकाने घटना ठिकाणास भेट देवून आजुबाजुच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची माहिती घेतली असता ते विंचरणा नदीजवळ काटवनात लपून बसलेले आहेत, अशी माहिती मिळाली. पथकाने लागलीच विंचरणा नदीपात्रा जवळील काटबनात जाऊन सापळा रचून जवळपास

दोन तास काटबनात शोध घेतला असता कुणाल जया पवार हा उसाच्या शेतात पळून जाताना दिसला. त्यास उसाच्या शेतातून ताब्यात घेतले. त्यास त्याचा साथीदार अक्षय उर्फ चिंग्या मोरे याच्याबाबत माहिती घेऊन त्यास बाकी (ता. जामखेड) येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द खून, खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत असे एकूण पाच गुन्हे जामखेड पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तसेच कुणाल जया पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द जबरी दुखापत व गंभीर दुखापत असे एकूण दोन गुन्हे जामखेड पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

Web Title: Arrested two people who opened fire on the trial

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here