Home महाराष्ट्र राज्यात 7 जून पासुन पावसाचे आगमन- पंजाब डख

राज्यात 7 जून पासुन पावसाचे आगमन- पंजाब डख

Arrival of rains in the state from 7th June Panjab Dakh Havaman today

Panjab Dakh Havaman: राज्यात काही प्रमाणात उकाडा वाढला असून काही दिवसातच पावसाचे (rain) आगमन होणार असल्याचे संकेत मिळत असताना आज पंजाब डख यांनी याची अधिकृत माहिती दिली आहे.

राज्यात यावर्षी मान्सून वेळेवर दाखल होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यात पंजाब डख यांनी दिलेली माहिती तंतोतंत जुळत असल्याने शेतीचे योग्य नियोजन करता येत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येत असून शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. तर आता दि. 7 जून पासून पावसाचे आगमन होणार असल्याची आनंदाची बातमी पंजाब डख यांनी दिली आहे.

राज्यात 7 ते 13 जून दरम्यान ठीक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाब डख यांनी आज दिली असून शेतकऱ्यांना तयारीत राहावे.

7 जून ला सातारा, सांगली येथून पावसाची सुरुवात होणार असुन 13 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात या पावसाने व्यापणार असल्याचे अंदाज यावेळी त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा ओलावा तपासुन स्वतः पेरणी चे नियोजन करावे असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी केले आहे.

Web Title: Arrival of rains in the state from 7th June Panjab Dakh Havaman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here