Home अहमदनगर संगमनेर: सहायक वनसंरक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडला

संगमनेर: सहायक वनसंरक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडला

assistant forester caught red-handed taking the bribe

संगमनेर | Bribe: संगमनेर येथील वन कार्यालयात रुजू झालेला सहायक वनसंरक्षक विशाल किसन बोराडे  यास चाळीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन निर्वाणीकरण झाल्याबाबतचा अभिप्राय देऊन जिल्हाधिकार्यांना अहवाल पाठविण्यासाठी बोराडे याने तक्रारदारास ४० हजार रुपयांची लाच मागितली. होती.

ती लाच घेताना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास आळेफाटा येथे रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारचा मावसभाऊ संगमनेर तालुक्यातील डोळसणे येथे राहत असून त्याची वनक्षेत्रात येत असलेली शेतजमीन ही निर्वणीकारण करावयाची होती. त्याबाबत अभिप्राय देऊन जिल्हाधीकार्याना अहवाल पाठविण्यासाठी संगमनेर येथील सहायक वनसंरक्षक विशाल किसन बोराडे याने तक्रारदाराकडे संगमनेर येथे ४० हजारांची मागणी केली होती.

सदर रक्कम आळेफाटा येथे देण्याचे ठरले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने सापळा रचत बोराडे यांना रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सदर कारवाई  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: assistant forester caught red-handed taking the bribe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here