Home अहमदनगर Crime News: महिलेचा विनयभंग करत डोक्यात घातला गज

Crime News: महिलेचा विनयभंग करत डोक्यात घातला गज

Crime news humiliated the woman and hit her on the head

राहता | Crime News: राहता तालुक्यातील एका गावात तरुणाने पती घरात नसताना स्वयंपाक घरात येऊन महिलेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केल्याची तसेच पाठीमागील बाजूने गज डोक्यात घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका जणाविरोधात राहता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पुणतांबा येथे २ जुलै रोजी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास पिडीत महिला स्वयंपाक करीत असताना त्याच दरम्यान पती औषध आणण्यासाठी पुणतांबा गावात गेलेले असताना दयानंद गोविंद काळे हा अचानक घरात आला. त्याच्या हात गजाचा तुकडा होता. त्याने घरात आल्यावर महिलेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत त्याच्या हातातील गजाने महिलेच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस मारहाण करत पळून गेला. महिलेने आरडाओरडा केल्याने शेजारील लोक जमा झाले. पती आल्यावर महिलेस उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून राहाता पोलिसांनी दयानंद गोविंद काळे याच्या गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल मंडलिक हे करत आहेत. 

Web Title: Crime news humiliated the woman and hit her on the head

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here