Home अहमदनगर पोलीस ठाण्यातच खून करण्याचा प्रयत्न

पोलीस ठाण्यातच खून करण्याचा प्रयत्न

Attempted murder at police station

नगर: तक्रार देण्यासाठी आलेल्या फिर्यादीवर पोलीस ठाण्यातच हल्ला करत खून (Murder) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

तोफखाना पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षात शनिवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत साहेबराव शंकर कोते वय ४९ रा. लालटाकी हा जखमी झाला आहे. पोलिसांनी राजू मुरलीधर काळोखे याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक पिंगळे करत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, साहेबराव कोते व राजू काळोखे हे दोघेही लालटाकी भागात राहतात. उसने पैसे घेण्यादेण्यावरून दोघांमध्ये शुक्रवारी भांडण झाले. यावरून तोफखाना पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. दोघांनाही शनिवारी सकाळी बोलावून घेण्यात आले. दोघे पोलीस ठाण्यात समोरासमोर येताच दोघांमध्ये पुन्हा वादावादी सुरु झाली. त्यावेळेस तेथे बाजूला पोलीस उभे होते. परंतु राजू काळोखे याने तोंडात ठेवलेले ब्लेडचे पाते काढून साहेबराव कोते यांच्यावर वार केले. कोते याने हाताने अडविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो रक्तबंबाळ झाला. मात्र त्याला गंभीर स्वरुपाची इजा झाली नाही असे पोलिसांनी सांगितले.  

Web Title: Attempted murder at police station

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here