Home अहमदनगर महिलेचा अश्लील व्हिडियो व्हायरल केल्याप्रकरणी एकास अटक

महिलेचा अश्लील व्हिडियो व्हायरल केल्याप्रकरणी एकास अटक

One arrested for viralizing a woman's pornographic video

कोपरगाव: पूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी व्हिडियो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीचा अश्लील व्हिडियो तयार करून व्हायरल केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यास अटक केली आहे

न्यायालयाने आरोपीस ६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय महिलेने कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले सीम कार्ड व मोबाईल जप्त करण्यात आले आहे.

आरोपी हा राहता येथील रहिवासी आहे. फिर्यादी महिलेच्या घराशेजारी कोपरगाव येथे राहत असलेल्या फिर्यादी महिलेशी ओळख केली. ते एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याने एक वर्षापूर्वी आरोपीविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली होती. आरोपीने महिलेच्या फोटोची अश्लील व्हिडियो तयार केला. सदर आरोपी हा महिलेस विनयभंगाची तक्रार मागे घे अन्यथा व्हिडियो व्हायरल करील अशी धमकी देत होता. मात्र महिलेने ऐकले नाही. आरोपीने २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अश्लील फोटोचा व्हिडियो प्रसारित करून महिलेची बदनामी केली.

याबाब महिलेने कोपरगाव शहर पोलिसांत २ एप्रिल रोजी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले अधिक तपास करीत आहे.    

Web Title: One arrested for viralizing a woman’s pornographic video

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here