Home अहमदनगर Theft: दुकानाचे शटर तोडून ११ लाखांचा मुद्देमाल लंपास

Theft: दुकानाचे शटर तोडून ११ लाखांचा मुद्देमाल लंपास

Shevgaon theft breaking the shutters of the shop

शेवगाव: शेवगाव शहरातील तहसील कार्यालयासमोरील नाथ टायर्स या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून आतमधील ११ लाख १० हजार रुपये किमतीचे टायर्स, ट्युब व मटेरीअल चोरून नेल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. हा धाडसी चोरीचा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

अभिजित गर्जे रा. निपाणी जळगाव ता. पाथर्डी दुकानाचे मालक यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, शुक्रवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मी माझे नाथ टायर्स चे दुकान बंद करून निपाणी जळगाव येथे गावी गेलो होतो. शनिवारी सकाळी ८:३० च्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आलो असता दुकानाच्या शटरच्या लोखंडी पट्ट्या तुटलेल्या दिसल्या व शटर एक फुट वर केलेले दिसले. शटर उघडून पाहिले तर टायर दिसले नाही. सर्व विखुरलेले होते. सीसीटीव्ही हार्ड डिस्क दिसून आल्या नाही.

अज्ञात चोरट्यांनी विविध कंपनीचे टायर व इतर साहित्य असे ११ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. पोलिसांनी अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ठाकरे हे करीत आहे.

Web Title: Shevgaon theft breaking the shutters of the shop

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here