Home महाराष्ट्र Lockdown in Maharashtra: राज्यात कडक निर्बंध, जाणून घ्या काय सुरु काय बंद

Lockdown in Maharashtra: राज्यात कडक निर्बंध, जाणून घ्या काय सुरु काय बंद

Weekend Lockdown in Maharashtra

Lockdown in Maharashtra: राज्यात उद्यापासून कडक निर्बंध लावण्यात येणार आहेत. तसेच विकेंड(Weekend Lockdown in Maharashatra) शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा नवाब मलिक यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आठवड्याचे पाच दिवस कडक निर्बंध तर शनिवार रविवार कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या सायंकाळी ८ वाजेपासून नियमावली लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एबीपी माझाच्या वृत्तानुसार, राज्यात कडक निर्बंध जारी करण्यात आले आहे. यादरम्यान नेमकी काय सुरु राहणार काय बंद राहणार जाणून घ्या:

 • शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत कडक लॉकडाऊन
 • लोकल ट्रेन सुरु राहणार
 • जिम बंद होणार
 • अत्यावश्यक सेवांना परवानगी
 • अत्यावश्यक सेवेतील लोकांना गाडी चालविण्याची पराबानागी
 • रात्री केवळ अत्यावश्यक सेवा चालू राहतील
 • धार्मिक स्थळांवर निर्बंध असणार
 • सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्ण बंद
 • गार्डन, मैदाने बंद
 • जिथे करोनाची आकडेवारी वाढते तेथे स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचा अधिकार
 • रिक्षा ड्रायवर + २ लोक
 • बसमध्ये केवळ बसून प्रवास करता येईल
 • टॅक्सीत मास्क लावा
 • कार्यालयात वर्क फ्रॉम होम सुरु करण्याच्या सुचना
 • मंत्रालय महत्वाचे ठिकाणी व्हिजिटर्स बंदी
 • चित्रपट शुटिंगला परवानगी आहे गर्दी करू नये लढाई आंदोलन शुटिंगला बंदी
 • बाजारपेठेत मर्यादित संख्या

करोनाची परिस्थिती संदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाची बैठक बोलाविण्यात आली. २ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात दोन दिवसांत लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हंटले होते.

Web Title: Weekend Lockdown in Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here