Home नाशिक नाशिक: एकतर्फी प्रेमातून भाच्याकडून मामीची हत्या

नाशिक: एकतर्फी प्रेमातून भाच्याकडून मामीची हत्या

Breaking News | Nashik Crime: एकतर्फी प्रेमातून भाच्याने मामीची हत्या (Killed) केल्याचा प्रकार उघडकीस, नेहमी मामीकडे शरीर सुखाची मागणी करत असायचा, मात्र मामी नकार देत होती याच कारणावरून हत्या.

Aunt killed by nephew due to one sided love

नाशिक रोड:  एकतर्फी प्रेमातून भाच्याने मामीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला असून जखमी झालेला भाचा ह्याची प्रकृती चिंताजनक आहे.

बुधवार (दि. ६) मार्च सामनगाव येथील एकलहरे रोडवर क्रांती बनेरिया या महिलेची तिच्या पतीचा भाचा अभिषेक सिंग याने एकतर्फी प्रेमातून क्रांती बनेरिया हीच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर सदरचा प्रकार उघडकीस येऊ नये व क्रांती यांची हत्या दुसऱ्या व्यक्तीने केली व माझ्यावरही वार केला असा बनाव करून अभिषेकने स्वतःच्या गळ्यावर चाकू मारून घेतला, परिणामी या घटनेनंतर अभिषेक गंभीर जखमी झाला. सध्या तो बोलण्याच्या स्थितीत नसला तरी नाशिक रोड पोलिसांनी त्याचा लेखी जबाब घेतला आहे.

अभिषेक सिंग हा त्याची मामी क्रांती बनेरिया हिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता व नेहमी मामीकडे शरीर सुखाची मागणी करत असायचा, मात्र मामी नकार देत होती याच कारणावरून अभिषेक सिंग याने बुधवारी रात्री क्रांती बनेरिया हिच्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली.

दरम्यान या घटनेचा नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक सुखदेव काळे, पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, हवालदार दीपक सोनार, विष्णू गोसावी, विजय टेमगर, सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, दत्तात्रय वाजे, योगेश रानडे, मनोहर कोळी, नाना पानसरे, अरुण गाडेकर, संतोष पिंगळ, महेंद्र जाधव, भाऊसाहेब नागरे, कल्पेश जाधव, यांनी या घटनेची सखोल चौकशी केल्यानंतर संशयित आरोपी हा अभिषेक सिंग असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान या घटने प्रकरणी मयत महिला क्रांती बनेरिया हिचा पती सुदाम मनेरिया यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या घटनेनुसार पोलीस पुढील तपास करत आहे.

Web Title: Aunt killed by nephew due to one sided love

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here