Home अकोला Bacchu Kadu : बच्चू कडू यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Bacchu Kadu : बच्चू कडू यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Bacchu Kadu pre arrest bail application Accepted

अकोला | Akola: अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांना आज बुधवारी  सत्र न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. वंचित आघाडीने राज्यमंत्री बच्चू कडू (bacchu kadu) यांच्याबाबत एका प्रकरणावर न्यायालयात दाद मागितली होती.. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार बच्चू कडू यांच्यावर सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात अटकपुर्व जामीन मिळावा यासाठी मंत्री कडू यांनी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार दोन्ही बाजूचा युक्तिवाद ग्राह्य धरून आज बुधवारी  सत्र न्यायालयाने अटकपुर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे

अकोल्यातील जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठविलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावामध्ये परस्पर बदल करून पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाखांचा निधीचा अपहार केल्याचा ठपका वंचित बहुजन आघाडीने केला होता.

Web Title: Bacchu Kadu pre arrest bail application Accepted

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here