Home पुणे Indurikar Maharaj:  इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत, ते वक्तव्य भोवणार?

Indurikar Maharaj:  इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत, ते वक्तव्य भोवणार?

Indurikar Maharaj in trouble once again

पुणे | Pune:  अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार तथा प्रबोधनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुण्यातील दोन जणांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, असे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

याबाबत  राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी तक्रार केली आहे. अकोला येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर यांनी माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ वाहिनीवर टाकणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील,  असे वक्तव्य केल्याचे वाकचौरे व भोसले यांचे म्हणणे आहे. तसे निवेदन व तक्रार त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे देण्यात आली आहे.. इंदुरीकर यांच्या वक्तव्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखविल्या गेल्या असल्याची त्यांची तक्रार आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाकचौरे व भोसले यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे.

दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्याची दखल घेतली. त्यानुसार त्यांनी अकोले पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी तक्रारीची प्रत जोडून याची चौकशी करावी, अशी सूचना पोलीस अधीक्षकांना केली आहे. दोषी आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६मधील कलम ९२ (अ) नुसार त्वरित गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, असा आदेशही दिला आहे.

Web Title: Indurikar Maharaj in trouble once again

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here