Home जामखेड Drowned: जलतरण तलावात बुडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Drowned: जलतरण तलावात बुडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू

unfortunate death of a child who drowned in a swimming pool

Ahmenagar | जामखेड | Jamkhed:  बीड-नगर महामार्गापासून जवळच मेहकरी फाटारोड गत असलेल्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या जामखेड येथील १४ वर्षीय मुलाचा बुडून (Drowned) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

आयान फयाज शेख असे मयत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे.

कडा येथील द्वारका प्रतिष्ठानचे इंटरनॅशनल गुरुकुल असून त्यांचाच बीड-नगर महामार्गापासून जवळच मेहकरी फाटा रोडवर जलतरण तलाव आहे. उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पोहण्यासाठी गर्दी होत असते. सकाळी जामखेड येथील आयान हा नातेवाईकांसह अहमदनगर येथे हॉस्पिटला गेला होता. अहमदनगरवरून जामखेडकडे येताना तो पोहण्यासाठी थांबला. यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: unfortunate death of a child who drowned in a swimming pool

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here