Home महाराष्ट्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा करोना अहवाल निगेटिव्ह

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा करोना अहवाल निगेटिव्ह

मुंबई: राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचा करोना अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांच्या परिवारासह कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महसुलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी टेलिफोन ऑपरेटरला करोनाची लागण झाली होती.

त्यानंतर सावधानता म्हणून बाळासाहेब थोरात यांनी स्वतः ला होमक्वारंटाईन करून घेतले होते. दरम्यान त्यांचा स्वॅब घेऊन करोना चाचणी करण्यात आली होती.

करोना प्रादुर्भाव वाढत असल्याने जनता हवालदिल झालेली आहे. आज त्यांचा अहवाल निगेटीव्ह आल्याने संगमनेर तालुक्यात कार्यकर्त्यांनी सुटकेचा श्वास टाकलेला आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Balasaheb Thorat Corona Test negative

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here