Home राष्ट्रीय मोठया धोक्यांपासुन वाचण्यासाठी बँका आता देणार छोटी कर्जे

मोठया धोक्यांपासुन वाचण्यासाठी बँका आता देणार छोटी कर्जे

मोठया धोक्यांपासुन वाचण्यासाठी बँका आता देणार छोटी कर्जे

नवी दिल्ली : एनपीए प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी बँकाना काही लक्ष्ये दिली गेली आहेत. त्यामध्ये काही प्रमाणत बँकांबाबत नरमाईचे धोरण अवलंबिले जाण्याची शक्यता आहे. तसेच बँकांनी कर्ज देण्यावर अधिकाधिकाऱ्यांनी लक्ष्य केंद्रीत करावे, असे त्यांना सांगण्यात येईल. या अनुषंगाने येत्या १५ सप्टेंबरला अर्थ मंत्रालय व रिझर्व्ह बँकेची एक बैठक आमंत्रित करण्यात आली असुन त्यामध्ये सरकरी बँकाच्या प्रमुख्यांनी बोलवण्यात आले आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

या बैठकीत एनपीएच्या निपटऱ्याबाबत आढाव घेण्यात येणार  आहे. तसेच बँकाना आवश्यक असलेल्या भांडवलाबाबतही विचार केला जाणार आहे. त्या दृष्टीने एक अहवालही तयार केला जाणार आहे. त्याचबरोबर वाढत्या एनपीएमुळे ज्या सरकारी बँकाना कर्ज देण्यात प्रतिबंध घालण्यात आले आहेत, ते संपुष्टातही आणले जावु शकतात. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी बँकाचा एनपीए आता ८ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला असुन अशामध्ये बँकाना त्यांचा एनपीए पाहुन तो कमी करण्यासाठी उदिष्टे ठरवुन देण्यात आले आहे. यामुळे बॅंकाच्या कर्ज देण्याच्या गतीमध्ये कमतरता आली आहे. यामुळे बँकेचे उत्पन्न कमी होण्याचे  शक्यता असुन अशामध्ये सरकारला वाटत आहे कि, एक  आजार बरा करतांना दुसरा आजार व्हायचा, त्यामुळे सरकारचा दृष्टीकोन  एकंदर समतोल ठेवण्याच्या आहे.

अर्थ मंत्रालयातील वरीष्ट अधिकाऱ्यांनी म्हटले आहे कि, या बैठकीमध्ये चर्चेसाठी मांडण्यात येणाऱ्या विषयांमध्ये  एनपीए व त्या संबंधीत कंपन्यांना दिलासा देणे , या बाबीही समाविष्ट आहेत. आर्थिक कारणामुळे जे कर्ज परत करत नाहीत, वा एकाच वेळी विशिष्ट मुदतीत जे कर्ज पेडण्यास तयार आहेत, त्यांना वा त्या कंपन्यांना बँकानी आपल्याला विवेकानुसार वा पटेल अशा धोरणांनी वेळ द्यावा. तसा तो वेळ बँका देऊ शकतात, त्याबाबत बँकाना एनपीए कमी करण्यासाठी उद्दीष्टांमध्ये सुधारण करणे वा दिलासा देणे गरजेचे आहे. सरकारचे लक्ष आता बँकाच्या क्रेडिट ग्रोथवरही असुन सध्या क्रेडिट ग्रोथ ८-९ %  आहे. मात्र छोटया कर्जांबाबत काही रिस्क घेता येते. यासाठीच बँकानी आता छोटी छोटी कर्जे देण्याकडे लक्ष द्यावे, असे सरकारी  अधिकाऱ्यांनी म्हणणे आहे.

मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here