Home महाराष्ट्र फवारणीसाठी गेलेल्या बापलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

फवारणीसाठी गेलेल्या बापलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

शेतात फवारणीसाठी गेलेल्या बापलेकाचा शेततळ्यात बुडून (Drowned) दुर्दैवी मृत्यू.

Bapleka, who had gone for spraying, drowned in the farm

पोफाळी | यवतमाळ: शेतात फवारणीसाठी गेलेल्या बापलेकाचा शेततळ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना उमरखेड तालुक्यातीला गंगनमाळ शेतशिवारात रविवारी (१७ सप्टेंबर) दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. या पत्नीसह मोठा मुलगा घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

बळीराम रंगराव खोकले (३६), सुदर्शन बळीराम खोकले (१०, दोघेही रा. गंगणनाळ) अशी मृत बापलेकांची नावे आहेत. कापसावर फवारण्यासाठी गंगनमाळ येथील बळीराम खोकले मुलगा सुदर्शनसह शेतात गेले होते. दरम्यान, फवारणीसाठी लागून असलेल्या नागोराव बोंबले यांच्या शेततळ्यातून मुलगा पाणी आणण्यासाठी गेला. पाण्याची कळशी भरत असताना सुदर्शनचा पाय घसरून पाण्यात पडला. ही बाब वडिलाच्या लक्षात येताच त्याला काढण्यासाठी ते धावले. यावेळी त्यांचाही तोल गेल्याने ते पाण्यात पडले. ही बाब लक्षात येताच शेजारच्या शेतातून त्यांच्याच भावाचा मुलगा आणि मुल‍ धावत आले. बापलेक पाण्यात बुडत असताना त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केला. मात्र तोपर्यंत  बापलेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. बोंबले यांच्या शेताती शेततळे जवळपास आठ ते दहा फू खोल असून, ते पाण्याने भरले आहे. घटनेची माहिती पोफाळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह उमरखेड येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. बापलेकाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गंगनमाट परिसरात शोककळा पसरली आहे.

Web Title: Bapleka, who had gone for spraying, drowned in the farm

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here