Home अहमदनगर ब्लॅकमेल करून खंडणी वसूल करणारी टोळी रंगेहाथ जेरबंद

ब्लॅकमेल करून खंडणी वसूल करणारी टोळी रंगेहाथ जेरबंद

Blackmail gang ransom gang arrested crime filed

श्रीरामपूर | Crime: ब्लॅकमेल करून खंडणी वसूल करणारी टोळी रंगेहाथ जेरबंद करण्यात लोणी पोलिसांना यश आले आहे. वनअधिकाऱ्याकडून १ लाख २० हजार रुपयांची खंडणी घेताना एका टोळीस रंगेहाथ पकडल्याची घटना श्रीरामपूर शहरात मंगळवारी सायंकाळी घडली. लोणी पोलिसांनी ही कारवाई पार पाडली आहे.

दिनांक १९ जुलै राहता विभागातील वनरक्षक संजय मोहनसिंग बेडवाल यांना श्रीरामपुरातील हुसेन दादाभाई शेख याने फोन करून तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत वकिलामार्फत हायकोर्टात जाणार आहे.तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत मला सर्व काही माहिती असून त्यांच्याकडे २५ लाखांची खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती १२ लाख करत दिले नाही तर हात पाय तोडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. २० जुलै रोजी २ लाख रुपये घेऊन ये असे धमकावले

याबाबत माहिती वनरक्षक बेडवाल, वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारी यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय अधिकारी संजय सातव यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळ्याचे रचण्याचे नियोजन करण्यात आले.

नियोजननुसार लोणी पोलीस स्टेशनचे पथक, वनरक्षक बेडवाल व दोन पंच असे खाजगी वाहनाने लोणीहून श्रीरामपुरातील वॉर्ड नं. १, साई व्हिला रूम नं. ३३ येथे राहणार्‍या हुसेन दादाभाई शेख याच्या घरी आले. पोलिसांनी बेडवाल यांना मागणी प्रमाणे सापळ्यातील रक्कम १  लाख २०  हजार रूपयांची रक्कम देऊन घरात पाठविले.

तेथे अनिल गोपीनाथ आढाव (रा. विरोबा लवनरोड, लोणी खुर्द, ता. राहाता) सलीम बाबामियॉ सय्यद (रा माळहिवरा, गेवराई) यांनी स्वीकारल्याने सापळ्यातील नियोजनाप्रमाणे त्यांना रोख रक्कम १ लाख २० हजार रूपये रोख रक्कमेसह पंचासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आली असून तिघांना अटक करण्यात आली आहे. वनरक्षक बेडवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Blackmail gang ransom gang arrested crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here