Home अकोले भंडारदरा, मुळा धरण पाणलोटक्षेत्रात पावसाची संततधार सुरु 

भंडारदरा, मुळा धरण पाणलोटक्षेत्रात पावसाची संततधार सुरु 

Continuous rains in Bhandardara dam Mula Dam

अकोले | Bhandardara Dam: रविवारपासून भंडारदरा आणि मुळा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. रविवारपर्यंत जेमतेम सरी बरसत होत्या. रिमझिम पाउस सुरु होता. त्यामुळे परिसरातील भात लागवडी खोळंबल्या होत्या.

रविवारी सायंकाळी पावसाने चांगलाच जोर धरला होता. रविवारपासून पावसाचा जोर सुरु आहे. मुळा खोऱ्यातही (Mula Dam) पावसाने चांगलाच जोर धरल्याने नदीप्रवाहात वाढ झाली आहे. पावसांच्या सरींमुळे भंडारदरा धरणात पाण्याची आवक सुरु आहे. मंगळवारी सकाळी भंडारदरा धरणात ३१६ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. निळवंडे धरणात ८४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे.

मागील १२  तासांत १९२ दलघफू पाणी दाखल झाले. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा ५२७५ दलघफू झाला आहे. पावसाचे प्रमाण असे टिकून राहिल्यास आज बुधवारी या धरणातील पाणीसाठा निम्म्यावर जाण्याची शक्यता आहे. निळवंडेतही नवीन पाणी येत असून काल सकाळी या धरणातील पाणीसाठा १५००  दलघफू होता.

Web Title: Continuous rains in Bhandardara dam Mula Dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here