Home अहमदनगर Crime: महिला वरिष्ठ अधिकाऱ्याचा विनयभंग, गुन्हा दाखल

Crime: महिला वरिष्ठ अधिकाऱ्याचा विनयभंग, गुन्हा दाखल

Harassment of a female senior officer crime Filed

शेवगाव | Crime: माझ्याजवळ मन हलके करीत जा, तुम्ही छान ड्रेस घालता, तुम्ही खूप छान दिसता असे म्हणत शेवगाव येथील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर मंगळवारी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महिला अधिकाऱ्याने शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून विशाल विजयकुमार बलदवा रा. मारवाड गल्ली शेवगाव असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.  फिर्यादीत म्हंटले आहे की, विशाल हा फोन करून कार्यालयात चकरा मारून ओळख वाढविण्याचा प्रयत्न करीत होता. अवैध व्यवसाय सुरु ठेवण्यासाठी मदत करून व त्यातून येणारे पैसे पोहोच करू असे लाचेचे आमिष दाखवीत असे, माझ्याजवळ मन हलके करीत जा, तुम्ही छान ड्रेस घालता. त्यामुळे तुम्ही छान व फ्रेश दिसता असे म्हणत महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा प्रयत्न केला. तसेच कौटुंबिक बदनामी करण्यात आली. महिला अधिकाऱ्याच्या पतीलाही मेसेज पाठवून त्रास दिला असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Harassment of a female senior officer crime Filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here