Home संगमनेर संगमनेरमध्ये घरफोडी, हजारांचे दागिने लंपास

संगमनेरमध्ये घरफोडी, हजारांचे दागिने लंपास

Breaking News | Sangamner Crime: चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कूलुप तोडून ७३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना.

Burglary in Sangamner, thousands of jewels looted

संगमनेर : चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कूलुप तोडून ७३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. ४) संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.  बटवाल मळा, गल्ली क्रमांक ३ मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पाराजी मारुती साबळे (वय ७०, रा. बटवाल मळा, गल्ली क्रमांक ३. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

पराजी साबळे हे घरी नसताना १ एप्रिल संध्याकाळी ५:१५ ते ४ एप्रिल संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरी चोरी झाली. चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे गंठन, चैन आणि अंगठी, असा एकूण ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Burglary in Sangamner, thousands of jewels looted

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here