Home अहमदनगर अहमदनगर: महाविद्यालयीन तरुणीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग

अहमदनगर: महाविद्यालयीन तरुणीचा रिक्षाचालकाकडून विनयभंग

Breaking News | Ahmednagar: महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या राहाता तालुक्यातील तरुणीचा शिर्डी येथील रिक्षाचालकाने विनयभंग (Molested) केल्याची घटना.

College girl molested by rickshaw puller

कोपरगाव: शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या राहाता तालुक्यातील तरुणीचा शिर्डी येथील रिक्षाचालकाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी कोपरगाव शहरात घडली. त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

 दि. २ एप्रिल रोजी सायंकाळी महाविद्यालय संपल्यानंतर त्या रिक्षाने घरी जात होत्या. शिर्डीतील रिक्षाचालक अरबाज शेख याच्या रिक्षात असताना त्याने रिक्षा ही मुंबई-नागपूर या महामार्गाने नेली होती व पुढे कोकमठाण शिवारात एका निर्जन स्थळी नेऊन रिक्षा थांबविली. त्याने एका तरुणीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. याप्रकरणी तरुणीने अरबाज शेख याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून विनयभंग व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला

Web Title: College girl molested by rickshaw puller

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here