Home अकोले अकोले तालुक्यात १२ एकर ऊस जळून खाक

अकोले तालुक्यात १२ एकर ऊस जळून खाक

Burn 12 acres of sugarcane in Akole taluka

अकोले | Akole: अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे दुर्दैवी घटना घडली आहे. अचानक लागलेल्या आगीत जवळपास १२ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सुगाव बुद्रुक शिवारात  गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

या आगीत विराज रामनाथ शिंदे, रमेश गंगाधर देशमुख, सुनील गंगाधर देशमुख, विलास निवृत्ती देशमुख, विजय पंढरीनाथ देशमुख,म नितेश तान्हाजी देशमुख, नारायण शांताराम देशमुख, अशोक त्र्यंबक देशमुख आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

आज लागल्याचे समजताच अकोले येथील अगस्ती सहकारी  साखर कारखान्याचा अग्निशामक बंब बोलाविण्यात आला. त्या बंबाद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र खूप उशीर झाल्याने आगीची क्षमता जास्त असल्याने १० ते १२ एक ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये काही ऊस सहा महिन्याचा तर काही ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत होता. त्यामुळे या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही.

Web Title: Burn 12 acres of sugarcane in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here