Home संगमनेर संगमनेर: घारगाव शिवारात कारची वाहनाला पाठीमागून धडक

संगमनेर: घारगाव शिवारात कारची वाहनाला पाठीमागून धडक

Sangamner Accident Gharagaon Area Car crash

संगमनेर | Sangamer Accident: संगमनेर तालुक्यात घारगाव शिवारात पुणे नाशिक महामार्गावर कारने वाहनाला जोराची धडक देऊन अपघात घडला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला.

या अपघातात चालक युवराज चंद्रकांत जाधव वय ४६, स्मिता युवराज जाधव वय ४०, वैष्णवी युवराज जाधव वय १८ सर्व रा. पिंपरी चिंचवड हे एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले आहेत. जखमींना आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर घारगाव शिवारात लक्ष्मी हॉटेलजवळ कारने पाठीमागून अज्ञात वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला.या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.  हा अपघात झाल्याचे समजताच महामार्ग डोळसणे पोलीस पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील साळवे, उमेश गव्हाणे, कैलास ठोंबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहायाने कार बाजूला घेण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.   

Web Title: Sangamner Accident Gharagaon Area Car crash

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here