Home अहमदनगर बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यात एकाने केला आत्महत्येचा प्रयत्न, काय आहे प्रकरण

बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यात एकाने केला आत्महत्येचा प्रयत्न, काय आहे प्रकरण

Suicide Attempt Case  in Balasaheb Thorat's bungalow

Suicide Attempt Case: महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवास्थानी रॉयल स्टोन बंगल्याच्या आवारात एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतः च्या अंगावर पेट्रोल टाकत स्वतः ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या व्यक्तीला अडविल्याने मोठा अनर्थ टळला. पांडुरंग वाघ असे या व्यक्तीचे नाव आहे. पांडुरंग वाघ हा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील झापडी या गावाचे रहिवासी आहे.

वाघ याने राज्य सरकारकडून २०१८ मध्ये वाळू उत्खनन आणि वाळू वाहतुकीचा परवाना मिळविला होता. यासाठी त्याने ८ लाख ७२ हजार रुपये भरून वाळू उत्खनन काम सुरु केले होते. मात्र स्थानिक लोकांच्या विरोधामुळे परवाना असताना देखील वाळू उपसा करता येत नव्हत. स्थानिकांच्या सतत विरोधामुळे वाघ यांचे नुकसान झाले. परवाना असताना देखील काम करणे अशक्य झाल्याने त्याचे मोठे आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. स्थानिकांना समजावून सांगितले तरी त्यांना त्यात यश आले नाही.

अखेर वाघ यांनी पैसे परत मिळावे यासाठी शासनाकडे धाव घेत  पाठपुरावा केला. वाघ यांनी भरलेले पैसे लवकर परत मिळावे म्हणून त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानाच्या दालनात स्वतः वर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वाचविल्यामुळे दुर्घटना टळली. गावदेवी पोलिसांनी त्याला अटक केली व जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.

Web Title: Suicide Attempt Case commit suicide in Balasaheb Thorat’s bungalow

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here