ब्रेकिंग न्यूज! सराफ व्यावसायिक हनीट्रॅपमध्ये अडकला, महिलेच्या नादाला लागला अन्…
Crime News | Ahmednagar HoneyTrap: सराफ व्यावसायिकाला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना महिला व तिच्या तीन पंटरांवर गुन्हा.
अहमदनगर: सोशल मीडियावर ओळख झालेल्या महिलेने नगर शहरातील सराफ व्यावसायिकाला हनीट्रॅपच्या (Honeytrap) जाळ्यात अडकवून १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे सराफ व्यावसायिकांत खळबळ उडाली असून नगर शहरात या विषयाची ‘खमंग’ चर्चा रंगली आहे. दरम्यान त्या सराफ व्यावसायिकाने यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून महिला व तिच्या तीन पंटरांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गौरी वैराळ (प्रेमदान हाडको, सावेडी), योगेश उर्फ सोनू पोटे (पत्ता माहिती नाही) व गौरी वैराळ हिच्या दोन महिला नातेवाईक (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मे २०२३ मध्ये फिर्यादीची सोशल मीडियावर गौरी सोबत मैत्री झाली होती. त्यानंतर तिने फिर्यादीला भेटण्यासाठी बोलविले. त्यांनी नकार दिल्याने गौरीने फिर्यादीच्या सराफ दुकानात येऊन अडीच ग्रॅमची सोन्याची अंगठी घेतली. त्याचे फक्त तीन हजार रुपये दिले. तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून ती फिर्यादीसोबत गोड बोलू लागली. तिने फिर्यादीला गांधी मैदान येथे बोलावून व्हॉट्सअॅप मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन १० हजार रुपये उकळले. तुझा किरीट सोमय्या सारखा व्हिडिओ असल्याचे सांगून बदनामी करण्याची धमकी दिली. तिने वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून फोन करून पैशाची मागणी करण्यास सुरूवात केली.
१० डिसेंबर रोजी अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन करून दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअॅप वरील मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादी घाबरून गौरीने बोलावलेल्या पाईपलाईन रस्त्यावरील कॅफेत गेले. तिथे गौरीच्या दोन नातेवाईक महिला उपस्थित होत्या. त्याच्या समोरच गौरीने फिर्यादीकडे मुलीच्या नावावर प्रत्येकी ५ लाख रुपये टाक, नाहीतर माझ्याशी लग्न कर, नाहीतर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी दिली. यावेळी योगेश उर्फ सोनू पोटे याने देखील तेथे येऊन पैसे देण्यास फिर्यादीला धमकावले. तेथून निघून गेल्यानंतर १६ डिसेंबर रोजी फिर्यादीच्या सराफ दुकानात गौरी आली व फिर्यादीच्या वडिल व कामगार यांच्यासमोर पैशांची मागणी केली. १८ डिसेंबर रोजी पुन्हा दुकानात येऊन धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Web Title: Businessman trapped in commercial honeytrap Extortion of Rs 10 lakh
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News