Home अहमदनगर ब्रेकिंग न्यूज: संगमनेरात बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त

ब्रेकिंग न्यूज: संगमनेरात बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त

Breaking News | Sangamner: बनावट मद्याचा साठा, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.

Stock of fake foreign liquor seized in Sangamner

संगमनेर: गोवा राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेला व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला १ लाख ७६ हजार ४८० रुपयांचा बनावट विदेशी मद्याचा साठा पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी शिवारातील जुन्या घाटानजीक राज्य उत्पादन शुल्क संगमनेर पथकाने जप्त केला आहे. बनावट मद्याचा साठा करणाऱ्यास पथकाने अटक केली आहे.

राजेंद्र सिताराम राहाणे (वय ४५, रा. आनंदवाडी, चंदनापुरी शिवार, ता. संगमनेर) असे आरोपीचे नाव आहे. नाताळ व नवीन वर्षाच्या निमित्ताने बनावट मद्य, परराज्यातील मद्य याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले होते. त्यानुसार संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, नगरचे अधिक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. चंदनापुरी शिवार जुना घाट येथे परराज्यातील मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार दुय्यम निरीक्षक व त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी जावून छापा टाकला. जुना घाट येथे रस्त्यावर हिरो होंडा कंपनीची दुचाकी एम. एचय १७ बी जे ४८८६ या दुचाकीवर गोवा राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेला व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला बनावट विदेशी मद्याच्या १८० मिलीच्या एकूण ४८ बाटल्या मिळून आल्या. बनावट मद्य विक्री करणारा राजेंद्र सिताराम राहाणे यास ताब्यात घेवून त्याच्या राहत्या घरी छापा टाकला असता बनावट विदेशी मद्याच्या ७५० मिलीच्या एकूण १५७ बाटल्या तसेच विदेशी मद्याचे विविध बँडचे प्लॉस्टिक बुचे, तसेच महाराष्ट्र राज्यात विक्रीस असलेल्या १८० मिलीच्या विदेशी मद्याच्या रिकाम्या बाटल्या बाहनासह असा एकूण १ लाख ७६ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क संगमनेरचे निरीक्षक सचिन श्रीवास्तव, दुय्यम निरीक्षक एम. डी. कोंडे, बी. वाय. चव्हाण, व्ही.जी सूर्यवंशी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुनिल वाघ, जवान एस. जी. गुंजाळ, वाहन चालक एस. एम. कासुळे सहाय्यक दुय्यम निरीक्षक बी. एम. चत्तर, सहाय्यक महिला जवान श्रीमती. एस. आर. वराट, श्रीमती. वाय.एस. सोनवणे यांनी पार पाडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक एम. डी. कोंडे हे करत आहे.

Web Title: Stock of fake foreign liquor seized in Sangamner

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here