Home संगमनेर Corona News: संगमनेर तालुक्यात २७ नवे करोनाबाधित रुग्ण

Corona News: संगमनेर तालुक्यात २७ नवे करोनाबाधित रुग्ण

Corona News Sangamner Taluka 27 new infected

संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज तब्बल २७ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या ११८० वर पोहोचली आहे. 

आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील रंगारगल्ली येथे ५६ वर्षीय महिला, घोडेकर मळा येथे ९ वर्षीय बालक, मोमिनपुरा येथे २० वर्षीय तरुण, कुंभारगल्ली येथे ६५ वर्षीय वृद्ध यांना करोनाची लागण झाली आहे. 

तर तालुक्यात आश्वी बुद्रुक येथे ५१ वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ५५ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे ७६ वर्षीय वृद्ध, राजापूर येथे ६२ वर्षीय पुरुष तर ५६ वर्षीय महिला, बोटा ४५ वर्षीय पुरुष, २२ वर्षीय महिला, १९ वर्षीय तरुण, ३९ वर्षीय पुरुष, पिंपरी लौकी येथे ३१ वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथे १४ वर्षीय तरुण, २५ वर्षीय महिला, वडझरी येथे २९ वर्षीय तरुण, कासरा दुमाला येथे ४६ वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे ६६ वर्षीय वृद्ध, वडगाव पान ४५ वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, १७ वर्षीय तरुणी, मेंढवन ७,६,७ वर्षीय मुलांना, गुंजाळवाडी येथे ४३ वर्षीय पुरुषाला करोनाची लागण झाली आहे. 

Web Title: Corona News Sangamner Taluka 27 new infected

Get See:  Latest Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here