Home संगमनेर Corona News: संगमनेर तालुक्यात एकाच दिवशी तब्बल ६६ करोना रुग्ण

Corona News: संगमनेर तालुक्यात एकाच दिवशी तब्बल ६६ करोना रुग्ण

Corona News Sangamner taluka 66 infected

संगमनेर | Corona News: संगमनेर तालुक्यात शनिवारी तब्बल 66 रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात करोनाचा प्रभाव हा वाढतच असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त आहे, तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या 1961 वर पोहोचली आहे.

आज  प्राप्त झालेल्या अहवालात संगमनेर शहरातील बाजारपेठ येथे  70 व 42 वर्षीय पुरुष, 42 व 38 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगी तसेच 7 वर्षीय बालक,  साईबन वसाहतीत 25 वर्षीय तरुण,  एस.टी वसाहतीतील 30 वर्षीय महिला, लालतारा कामगार सोसायटीतील 45 वर्षीय पुरुष,  मालदाड रोड येथे 39 वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथे 19 वर्षीय तरुणी व 85 वर्षीय वृद्ध महिला,  इंदिरानगर येथे  49 वर्षीय पुरुष,  जनतानगर येथे 59 वर्षीय व्यक्ती, 25 वर्षीय तरुण व चंद्रशेखर चौक येथे 22 वर्षीय तरुणी असे 15 बाधित आढळून आले आहेत.

तालुक्याच्या रुग्ण संख्येत तब्बल 51 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये कौठे धांदरफळ येथे 55 व 32 वर्षीय महिला, 34 वर्षीय तरुण, 11, 8, 9 व 7 वर्षीय मुले,  घुलेवाडी येथे 33 वर्षीय महिला,  मंगळापुर येथे 11 वर्षीय बालिका, रायते येथे 41 वर्षीय पुरुष,  संगमनेर खुर्द येथील 18 वर्षीय तरुणी, 15 वर्षीय बालक, दाढ खुर्द येथे 48 व 26 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे 63 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला,  रहिमपूर मधील 27 वर्षीय तरुण, 5 वर्षीय बालक,  कुरकुटवाडी येथील 80 वर्षीय वृद्ध, माळवाडी येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक,  21 वर्षीय तरुण, कवठे बुद्रुक येथे 54 वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथे 65 वर्षीय महिला, चोरकवठे येथे 67 वर्षीय महिला,  कवठे कमळेश्वर येथे 26 वर्षीय पुरुष, कौठे बुद्रुक येथे 55 वर्षीय पुरुष,  कासारा दुमाला येथे 62 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडीतील 40 वर्षीय पुरुष, निमोण येथे 65 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला व 22 वर्षीय तरुण, वाघापूर येथील 15 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, रायतेवाडी येथील 52 वर्षीय पुरुष, गोल्डन सिटी येथील 70 वर्षीय वृद्ध, 35 वर्षीय महिला, 15 वर्षीय बालिका व 15 वर्षीय बालक, गुंजाळवाडी येथे 58 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, कालेवाडी येथील, 52 वर्षीय पुरुष, कवठे धांदरफळ येथे 57 वर्षीय महिला, सुकेवाडी येथील 80 वर्षीय महिला, वडगाव पान येथील 33 व 38 वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथील 45 वर्षीय महिला,  मनोली येथे 72 वर्षीय महिला, हिवरगाव पठार येथे 55 वर्षीय पुरुष, खराडी येथील 28 वर्षीय तरुण, चंदनापुरी येथील 52 वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथील 41 वर्षीय महिला असे 66 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे  तालुक्याची एकूण 1961 इतकी झाली आहे

Web Title: Corona News Sangamner taluka 66 infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here