संगमनेरात पोलीस रस्त्यावर, नियमांचे उल्लंघन होत असल्यास चोप
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात दोन दिवसांत १८५ रुग्णांची वाढ झाल्याने बाधित संख्या ८१७६ झाली आहे. शुक्रवारी ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ७५१५ रुग्णांनी आत्तापर्यंत करोनातून बरे झाले आहे. ६३ जणांचा करोनाने बळी घेतला आहे.
शहरातील बाधित संख्या २४८७ तर ग्रामीण भागात ५६८९ आहे. सर्वाधिक रुग्ण हे १५२९ सप्टेंबर २०२० मध्ये सापडले तर त्याखालोखाल मार्च २०२१ मध्ये १३६५ रुग्णांची नोंद झाली आहे.
शुक्रवारी पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांना काठीचा प्रसाद देत दंडात्मक कारवाई केली.
शुक्रवारी तहसीलदार अमोल निकम, पोलीस उपधीक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख रस्त्यावर उतरून प्रबोधन केले. विविध ठिकाणी विना मास्क आढळणाऱ्या नागरिकांवर चोप देत कारवाई केली.
Web Title: Corona Sangamner Police on Road action