Home अकोले अकोले करोना ब्रेकींग: तालुक्यात तब्बल पाच  जण करोनाबाधित   

अकोले करोना ब्रेकींग: तालुक्यात तब्बल पाच  जण करोनाबाधित   

Coronavirus Akole taluka corona Breaking News

Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यात आज बुधवारी तब्बल पाच जण करोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अकोले तालुक्यातील चास येथील तीन जण यात ३९ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, १६ वर्षीय मुलगी तर  देवठाण येथील ८० वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आली आहे. उंचखडक येथील ६५ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४६ झाली आहे. तालुक्यात ३७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. तर आठ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संगमनेर तालुक्यात आज तब्बल ३१ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. संगमनेरचे आज सायंकाळी २४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Akole taluka corona Breaking News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here