Home अकोले अकोले तालुक्यात शुक्रवारी एकाच दिवशी आठ करोनाबाधित

अकोले तालुक्यात शुक्रवारी एकाच दिवशी आठ करोनाबाधित

Coronavirus Akole taluka eight corona infected

Coronavirus/अकोले: अकोले तालुक्यात काल शुक्रवारी वेगवेगळ्या टप्प्यात आठ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्याची एकूण संख्या ५८ झाली आहे.

काल सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात तालुक्यातील बहिरवाडी येथील ४१ वर्षित करोना पॉझिटिव्ह आढळून आला. सायंकाळी प्राप्त अहवालात कारखाना रोडवर एक नेता व एक २४ वर्षीय तरुण तसेच परखतपूर रोड येथे ४१ वर्षीय व्यक्ती आढळून आला आहे.

शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील कारखाना रोड येथील हासे कॉम्प्लेक्स मधील पूर्वी बाधीताच्या कुटुंबातील एक ४४ वर्षीय महिला, २४ व २५ वर्षीय युवक असे तीन रुग्ण करोना पॉझिटिव्ह आले आहेत तर लाहित येथील २६ वर्षीय महिला करोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. त्यामुळे शुक्रवारी एकाच दिवशी आठ करोना पॉझिटिव्ह मिळून आले आहेत. तालुक्याची संख्या ५८ वर गेली आहे. अकोले शहरातही करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.  

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Coronavirus Akole taluka eight corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here